
बाहेरच्या खोलीत आत्महत्या केलेल्या पत्नीचे पार्थिव; तर आतल्या खोलीत पती प्रेयसीसोबत; पोलिसांनी घातल्या बेड्या…
गोपेश्वर (उत्तराखंड): जिल्हा मुख्यालयाजवळील ग्वाद गंगलोल गावात कुसमादेवी नावाच्या एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी, पोलिसांनी पती विक्रम याच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रात्री पत्नीच्या निधनामुळे शोक करत असलेल्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी, आरोपीला घरातील दुसऱ्या खोलीत त्याच्या दुसऱ्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले. गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शांततेचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी पतीला तुरुंगात पाठवले आणि महिलेला चौकशीनंतर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. गावातील महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन संताप व्यक्त केला आणि कुसमाच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी ग्वाद गंगलोल गावातील एका घरात कुसमा देवी यांचा मृतदेह दोरीने लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. या प्रकरणात मृत कुसमादेवीच्या बहिणीच्या पतीवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
घरात अंत्यविधीची तयारी चालू होती. नातेवाईक आणि गावकरी सर्वजण शोक करत होते. मात्र, मृताच्या मुलांनी गावप्रमुखांना माहिती दिली की, कुसमादेवीचा पती विक्रम लाल काल रात्री एका महिलेसोबत घरात होता.
विक्रमलालला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. गावकऱ्यांनी घराला बाहेरून कडी लावली आणि पोलिसांना बोलावले. शोध घेतला असता, जवळच्याच गावातील एक विधवा तिथे उपस्थित असल्याचे आढळले. गोपेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी नवनीत भंडारी यांनी सांगितले की, त्या महिलेचे विक्रमसोबत प्रेमसंबंध होते.
पोलिसांनी आत्महत्या प्रकरणात महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला आहे. शांतता भंग केल्याप्रकरणी आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. विक्रमसोबत सापडलेल्या महिलेला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या विधवेलाही दोन मुले आहेत.

