पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…

पुणे : सदनिका नावावर करून देणे आणि घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आयटी अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केशवनगर (मुंढवा) येथे घडली आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. त्रिष्णा राहुल सकपाळ (वय 33, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण निकम (वय 74 […]

अधिक वाचा...

पाकिस्तानी दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान असलेले श्रीनगरमधील घर एनआयएकडून जप्त…

श्रीनगरः राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) श्रीनगरमधील हजरतबल येथील दनिहामा येथील एक निवासी मालमत्ता जप्त केली आहे. या इमारतीचा वापर पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाच्या (एलईटी) दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी आणि गुन्हेगारी साहित्य लपवण्यासाठी केला जात होता, असा आरोप आहे. दानिहामा गावातील खसरा क्रमांक ३१५ येथे असलेली ही मालमत्ता, आरोपी गुलाम मोहम्मद मीर उर्फ ​​मामा गॅस याची आहे. एनआयएच्या महासंचालकांच्या […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! लग्न ठरल्याने प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून; प्रियकराने सांगितले…

कोल्हापूर : प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याप्रकरणी प्रियकराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाईकवाडी धबधब्याजवळ ही घटना घडली. तरन्नुम बशीर नाईक (वय २२) या युवतीचा यामध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात स्वतःहून हजर झालेल्या श्रीपाद दिनकर वडरने खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी यामधील घटनाक्रम सांगितला आहे. युवतीच्या मृत्यूमागील नेमका घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलिसांकडून विविध पुरावे तपासले […]

अधिक वाचा...

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पोलादपूरमध्ये पतीस अटक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…

पोलादपूर: रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांची सून गार्गी गणेश दरेकर हिने कोतवाल बुद्रुक येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलादपूर पोलिस ठाण्यात पती गणेश मुरलीधर दरेकर याच्यासह अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दरेकर याला अटक करण्यात आली असून, महा़डच्या न्यायालयात […]

अधिक वाचा...

नाशिक हादरलं! युवती आजारी असतानाही दोघांकडून लैंगिक अत्याचार…

नाशिक: नाशिकच्या पंचवटीतील पवार चाळ परिसरात युवतीवर (वय १९) अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित युवती आजारी असतानाही दोन आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. विक्रमकुमार शाह आणि अशोक शाह (दोघेही रा. गोपालगंज, बिहार) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची […]

अधिक वाचा...

अंमली पदार्थविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांची पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या; फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण…

मानसा (पंजाब): पंजाबमधील मानसा येथे एका औषधाच्या दुकानावर झालेल्या संघर्षात्मक छाप्यादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. अवैध औषध विक्रीवरून दुकानदारासोबत झालेल्या जोरदार वादानंतर उफाळून आलेल्या या हिंसक झटापटीत, झोटा यांचे चार साथीदार गोळीबारात जखमी झाले आहेत. घटनेची खबर मिळताच […]

अधिक वाचा...

महिला पोलिस स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू; बहिणीचा गंभीर आरोप…

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यू असून, स्मिता माने यांचे पती पोलिस कॉन्स्टेबल सचिन माने याला कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या घटनेमुळे पोलिस दल आणि संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. महिला हवालदार स्मिता माने या मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या कुणालाही […]

अधिक वाचा...

पूर्णेकर हत्याकांडातील पाचवा हेल्मेटधारी आरोपी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपेक्षा वेगळा – राम पूर्णेकर…

ठाणेः प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडातील पाचवा हेल्मेट घातलेला आरोपी आणि पोलिसांनी अटक केलेला अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू, याच्याबाबत पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी शंका उपस्थित केल्यामुळे, खळबळ उडाली आहे. हेल्मेट घातलेला आणि फरार असलेल्या या आरोपीची शरीरयष्टी आणि सीसीटीव्ही फूटेजमधील व्यक्ती, यांच्यात तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. […]

अधिक वाचा...

ओमानजवळ टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीय खलाशी बेपत्ता; ९ जणांची सुटका…

नवी दिल्लीः ओमानमधील सोहार बंदरामध्ये निकाराग्वा देशाचा ध्वज असलेल्या ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’, या टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, दोन भारतीय कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. टँकरवरील अन्य ९ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज येथे सांगितले. ‘एक्स’ या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, सोनोवाल यांनी म्हटले आहे, की […]

अधिक वाचा...

बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात ग्वादरमध्ये पाकिस्तानी तटरक्षक दलाचे १३ जवान ठार…

इस्लामाबाद: बलुचिस्तानच्या ग्वादर जिल्ह्यातील जिवानी येथे बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) एका तुकडीने पाकिस्तानच्या तटरक्षक दलाच्या दोन बोटींवर जोरदार हल्ला केला. त्यात तटरक्षक दलाचे १३ सैनिक ठार झाल्याचे बीएलएच्या सूत्रांनी सांगितले. ही कारवाई त्यांची सागरी शाखा असलेल्या हम्माल मेरिटाइम डिफेन्स फोर्सने केल्याचा दावा या गटाने केला आहे. बीएलएने या कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. एका निवेदनात त्यांनी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!