शासकीय नोकरी असल्याची थाप मारून केले लग्न; परंतु चार महिन्यात पत्नीची आत्महत्या; छत्रपती संभाजीनगर हादरले…

छत्रपती संभाजीनगरः येथील हडको परिसरातील वानखेडेनगरमध्ये संजना नीलेश शेजवळ (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीकडून फसवणूक आणि सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप संजनाच्या माहेरच्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे शासकीय नोकरीची थाप मारून लग्न केल्याचा आरोप, पती निलेश शेजवळ याच्यावर करण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे.

शासकीय नोकरीला असल्याची थाप मारून लग्न केले, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पतीचा बनाव उघड झाला. त्यातच स्वयंपाक आणि कपड्यांवरून सासरच्या मंडळींकडून सतत हिणवले जात असल्याचा आरोप आहे. या सगळ्या मानसिक त्रासातून छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरात राहणाऱ्या संजनाने आत्महत्या केल्याचे समजते.

लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. १३ ऑक्टोबर रोजी वानखेडेनगर येथील सासरी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. सासरच्या मंडळींनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संजनाच्या वडिलांना पतीने शासकीय नोकरीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा, तसेच सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!