
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखीच घट्ट झाला आहे. वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयात त्याला आज (मंगळवार) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर, कराडच्या वकिलाने विरोध केला. न्यायालयातील सुनावणीत कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हा आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यामुळे वाल्मिक कराडला दिलासा मिळेल अशी शक्यता होती. मात्र, एसआयटीने कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला असून कराडचा ताबा मागितला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराडलाही आरोपी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केल्यानुसार आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संघटीत गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाकडून त्यास पुन्हा सीआयडी कोठडी सुनावण्यात येईल. या सीआयडी तपासात मकोकासंदर्भाने तपास केला जाईल, ज्यामध्ये 302 अंतर्गत दाखल झालेल्या संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
दरम्यान, मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मकोकाअंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करावा लागतो. ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यामुळे, मकोका अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.
खुनाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आलेले नाही, त्यामुळे मकोका लावण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे, आम्ही वाल्मिक कराडसंदर्भाने न्यायालयीने प्रक्रियेला समोरे जाऊ असे, वाल्मिक कराडचे वकील अॅड. सिद्धेश्वर ढोंबरे यांनी म्हटले आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, जामिनासाठी अर्ज करता येणार आहे, त्यानुसार आम्ही जामीनासाठी अर्ज केला असून पुढील 2-3 दिवसांत जामीन अर्जावर सुनावणी होईल, असेही अॅड. ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

