भीषण अपघात! सांगलीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे….

सांगली: तासगाव-मणेराजुरी मार्गावर मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री कारला झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबामधील सहा जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे. चिमुकलीचा वाढदिवस साजरा करून हे कुटुंब परतत होतं, तेव्हाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातामधून सुदैवाने एक मुलगी बचावली पण तिला सहा मृतदेहांसोबत अख्खी रात्र काढावी लागली.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी तासगाव-मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. या जबर धक्क्याने कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.

अपघातग्रस्त कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघात झाला तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. परिणामी या कुटुंबाला वेळेत मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वर्दी देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
राजेंद्र जगन्नाथ पाटील – वय 60
सुजाता राजेंद्र पाटील -वय 55
प्रियांका अवधूत खराडे वय 30 वर्ष (बुधगाव)
ध्रुवा- वय 3 वर्ष
कार्तिकी- वय 1 वर्ष
राजवी- वय 2 वर्ष

जखमी
स्वप्नाली विकास भोसले वय 30 वर्ष

भीषण अपघात! पुणे शहरात ट्रकने दोन महाविद्यालयीन युवकांना चिरडले…

शिक्षक आमदारच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार…

नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू…

भीषण अपघाताचा लक्ष विचलीत करणारा Video; पाच जागीच ठार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!