
लखोबा लोखंडे! पुणे शहरातील एकाने 25 हून अधिक महिलांची केली फसवणूक अन्…
पुणे: पुण्यातील एका लखोबा लोखंडे याने लग्नाचे आमिष दाखवून 25 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संबंधित लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फिरोज शेख (वय ३२) असे आरोपीचं नाव आहे. लग्न जमविणाऱ्या एका संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत फिरोज शेख त्यांच्याशी संपर्क साधत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोल्हापूरातील फसवणूक झालेल्या घटस्फोटीत महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्यावर कारवाई केली. फिरोज शेख याला ताब्यात घेतल्यानंतर पंचवीस हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली या आरोपीने दिली.
फिरोज निजाम शेख हा मुळचा इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथील रहिवाशी आहे. सध्या तो पुण्यातील कोंढवा येथे राहतो. इंदापूरमध्ये पण त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा असल्याचे तपासात समोर आले आहे. फिरोजने लग्नाचे आमिष दाखवत 25 महिलांना फसवले. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यांच्याकडून त्याने पैसे उकळल्याचे समोर आले आहे. काही महिलांकडून तर त्याने लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर येथील एका घटस्फोटित महिलेला लग्न जमविणाऱ्या एका संकेतस्थळाच्या माध्यमातून फिरोज शेख याने जाळ्यात अडकवले. आपण इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याची थाप मारत त्याने युवतीसह कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. युवतीशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्याकडून 1 लाख 69 हजार उकळले. तर 8 लाख 25 हजारांचे दागिने पण घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लग्नाचा विषय आला तेव्हा आपल्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचा दावा त्याने केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने कोल्हापूरातील राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फिरोज शेख याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…
युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…
डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

