
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळे याला पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय, हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या आणखी एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे एकूण तिघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतरच आरोपींचा ठावठिकाणा सापडला, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
बीड पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. आरोपींना आता पुढील तपासासाठी सीआयडीकडे सुपूर्द केले जाणार आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक लवकरच पोलीस विभागाकडून काढण्यात येणार आहे. आरोपींनी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. हत्येच्या या घटनेनंतर सर्व आरोपी फरार होते. आता बीड पोलिसांना मोठं यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी आणि एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काहीजण फरार झाले होते, त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार होते. त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे त्यांना आज कोर्टात देखील हजर केला जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सुदर्शन घुले आरोपी आहे आणि सुधीर सांगळे हा सहआरोपी आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायभसे यानी या आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती, त्याला बीड प्रथम ताब्यात घेतलं. त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास एस आय टी, सीआयडी करत असली तरी तरीही अटक पोलिसांनी बीडच्या स्थानिक पोलीस यांनी केलेली आहे. लवकरच याबाबतची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक देतील. यासंदर्भातली लवकरच पत्रकार परिषद होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप अधिकृत नसली तरी देखील, गेल्या 26 दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी होते. जे पळून जाण्यात यशस्वी झाले होते, त्यांना पकडण्यासाठी तीन टीम काम करत होत्या. मात्र, आज या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह त्याची वकील त्यांना एसआयटीने ताब्यात घेतले आहे. संभाजी वायभसे हा स्वतःचा हॉस्पिटल बीड शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी चालवायचा. मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे, ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला. संभाजी वायभसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. त्याची पत्नी वकील आहे. त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केले आहे. ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी वायभसे फरार असल्याची माहिती होती. पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मात्र तो सापडत नव्हता. सुदर्शन घुले सह संभाजी वायभसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती, त्याने राज्य बाहेर जाऊन सुदर्शन घुले याला मदत केली होती. संभाजी वायभसेपर्यंत पोलीस पोहोचले, तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे. या प्रकरणाच्या कुटुंबाचा समावेश आहे का याचाही तपास केला जातोय. संभाजी वायभसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला. काल त्याला ताब्यात घेतले, रात्री त्याला बीडमध्ये आणले, त्यानंतर त्याची चौकशी झाली. त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आला आहे.

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

