धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…

जयपूर (राजस्थान): एका पतीने आपल्या पत्नीला बेडरुममध्ये पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले. चिडलेल्या नवऱ्याने हातामध्ये धारदार शस्त्र घेत पत्नीसह युवकांवर सपासप वार केले. यामध्ये पत्नीसह एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान हा गुन्हा उघड केला आहे.

पत्नी आणि एका तरुणाची हत्या करून पती फरार झाला आहे. यामागे नेमकं कारण काय आहे, याचा पोलिस सर्व बाजूंनी तपास करत होते. पोलिसांना तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती मिळाली. पत्नीच्या कृत्यानं पतीच्या संतापाचा पारा चढला आणि त्यामुळे पत्नीला जीव गमवावा लागल्याची घटना राजस्थानातील बारां येथे घडली आहे. पोलिसांना घरात एका विवाहित महिलेचा मृतदेह सापडला. सोबत एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिस चौकशीत या दुहेरी हत्येमागे महिलेचा पती असल्याचे पुढे आले आहे. अंता पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या धाकडखेडी गावात ही घटना घडली आहे. घरातील बेडरुमध्ये पत्नी पाच युवकांसह दारूची पार्टी करत असल्याचे पाहून पतीचा संताप अनावर झाला. त्यामुळे त्यानं स्वयंपाकघराताल चाकू घेऊन पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर त्यानं पाचही युवकांकडे मोर्चा वळवला. त्यापैकी चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. एकाला आरोपीने पकडले आणि त्याच्यावरही चाकूने वार केले. त्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. घरातून आरडाओरडा ऐकून शेजारी घरी आले, तर तिथे महिला आणि एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले; मात्र त्यापूर्वीच महिलेचा (वय ३०) मृत्यू झाला होता. युवक गौरवसिंह हाडा (वय २०) गंभीर जखमी झाला होता. युवकाला अंता येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस उपअधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (1 जानेवारी) रात्री उशिरा घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील चौघे फरार युवक कोटा येथील आहेत. हे दुहेरी हत्येचं प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असू शकते, असा पोलिसांना संशय आहे. पोलिस अनेक बाजूंनी हत्येचा तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्याही मिळाल्या आहेत. या हत्येमागे महिलेचा पती असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Video: प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पकडले रंगेहात अन् भररस्त्यातच…

पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…

Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

पोलिसांची गुप्त खोलीत धाड; ८ युवती अन् २ मुलांना पकडले रंगेहाथ…

मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!