पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…

नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीचवर शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास एका कारने पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना धडक दिली. या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. संबंधित वाहनाच्या चालकाविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील पाम बीचवर मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एका कारने पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. पेट्रोलिंग करताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या दोन व्यक्तींना उचलण्यासाठी पोलिसांनी गाडी उभी केली होती. याच दरम्यान पाठीमागून आलेल्या कारने पोलिसांच्या वाहानाला धडक दिली.

दरम्यान, या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी देखील वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. एक पोलिस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी या अपघात प्रकरणात चालकाविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…

पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसकाकांनी आजीला काही मदत हवी आहे का? असे विचारले अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!