
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून उचललं तर तिसरा आरोपी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलाहाबादमध्ये जात आज (सोमवार) अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी आधीच अटकेत असून तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे.
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणी आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. न्यायालयाकडून पहिल्यांदा अटक झालेल्या आरोपीला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी आहे. बोपदेव घाटात युवतीवर (वय २१) सामूहिक बलात्कार करणाऱ्या 25 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पुणे पोलिसांनी या आरोपीला शुक्रवारी (ता.14) पहाटे येवलेवाडी परिसरातून अटक केली होती. त्यानंतर त्याला शनिवारी (दि.14) दुपारी शिवाजीगर येथील पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयाने 14 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
बोपदेव प्रकरणात आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. आरोपींच्या दोन साथीदारांना अटक करायची आहे. अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे. आरोपींनी लूटमार करण्यासाठी वापरलेले हत्यार, वाहन जप्त करायचे आहे. आरोपींनी पीडितेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली असून, ती हस्तगत करायची आहे. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. अन्य आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला होता. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
बोपदेव घटनेतील आरोपींनी सापडू नये म्हणून कशी केली पोलिसांची दिशाभूल पाहा…
मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती…
पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…
पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…
पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

