पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत प्रथम अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी युवती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, गुरूवारी (ता. ३) रात्री 21 वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. रात्री 11च्या सुमारास ते तिथे गेले होते. 3 जणांनी मुलांना मारहाण करत अतिप्रसंग केला आहे. या घटनेची माहिती आपल्याला आज (शुक्रवार) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात एकुण 10 पथकं कामाला लावली आहेत. अनेकांची चौकशी सुरु आहे. एकुण 3 मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेर राज्यातील असून, पुणए शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. बोपदेव घाटात नेहमी लोक वॉकिंगला जातात. यावेळी ही घटना समोर आली, मारहाण करत मित्राला त्याठिकाणी बाधून ठेवलं होतं. मुलगी गंभीर जखमी आहे, तिच्यावरती देखील उपचार सुरु आहेत.’

दरम्यान, या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतापजनक पोस्ट लिहली आहे. सोशल मिडिया एक्सवरती सुळे यांनी पोस्ट लिहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये, “अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…

पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!