
जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन…
मुंबई : जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे (वय ५७) यांचे आज (सोमवार) निधन झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले.
अतुल परचुरे यांनी बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केले. शिवाय चित्रपटात देखील त्यांच्या वेगवेगळ्या भूमीका गाजल्या. अतुल परचुरे यांची ‘जागो मोहन प्यारे’ ही मालिका ही हिट ठरले, ज्यामुळे ते लोकांच्या घरोघरी पोहोचले. अतुल परचुरे हे त्यांच्या विनोदी पात्रांसाठी ओळखले जात होते. अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले.
अतुल परचुरे यांना दोनवर्षापूर्वी म्हणजे 2024 मध्ये कॅन्सरची लागण झाली. याबद्दल त्यांनी स्वत: सांगितले होते. त्यानंतर त्यांनी यशस्वीपणे यावर मात केली. त्यानंतर ते काही शोमध्ये उपस्थित पण होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…
अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…
अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…
‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…

