
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू जुली यादवचा मोबईल घरी विसरला अन् घात झाला…
लखनौ (उत्तर प्रदेश): राष्ट्रीय पातळीवरील हॉकीपटू आणि क्रीडा शिक्षिका जूली यादव हिचा रविवारी (ता. ९) सकाळी अपघाती मृत्यू झाला. गॅस सिलिंडरने भरलेल्या एका अज्ञात डीसीएम ट्रकने जूलीच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात पारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौदा मोड परिसरात झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
सिलिंडर भरलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत जूली गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून तिला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपी वाहन आणि चालकाचा शोध सुरू आहे.
जूली यादव पारा परिसरात राहत होती आणि एलपीएस (LPS) शाळेत स्पोर्ट्स टीचर म्हणून कार्यरत होती. रविवारी सकाळी सुमारे 6:15 वाजता ती शाळेत होणाऱ्या इंटर-स्कूल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निघाली होती. परंतु, मोबाईल घरी विसरल्यामुळे ती वळून परत जात असताना मौदा मोड येथे ट्रकने तिच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण धडकेत जूली गंभीर जखमी झाली आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. जूलीचे वडील अजय यादव शेतकरी असून, आई गुड्डी देवी गृहिणी आहेत. तिचा धाकटा भाऊ अमन शिक्षण घेत आहे. जूली केवळ क्रीडा शिक्षिका नव्हती, तर ती राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीय, शाळेतील सहकारी आणि संपूर्ण क्रीडा जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक! कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् हादरलीच…
प्रसिद्ध कबड्डीपट्टूची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या…
दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…
गौतमी पाटील कार अपघाताबाबत म्हणाली; मला विनाकारण दोष दिला जातोय…
माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…

