पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे : पुणे शहरातील बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) मध्यरात्री घडली आहे. युवतीवर सामूहिक बलात्कार झाला असून तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

युवती (वय २१) ही मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला रात्री गेली होती. तिच्यावर तिघांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बलात्कार केला. या घटनेची माहिती पोलिसांनी पहाटे पाचच्या सुमारास मिळाली. पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली.

पीडित युवतीच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…

पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!