मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…

पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटात 21 वर्षीय युवतीवर 3 ऑक्टोबर रोजी तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते. घटनेची सखोल चौकशी सुरु होती. अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्यांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

बोपदेव घाटात 21 वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याराच प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम पोलिसांनी तयार केल्या होत्या. मात्र घटनेच्या 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात होता. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती घेण्यात आली आहे.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलिस स्टेशनने प्रसिध्द केले होते. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले होते.

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती…

पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…

बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…

पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…

पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…

पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!