
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…
पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका युवतीवर (वय २१) सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत, दोन आरोपीचे स्केच देखील पोलिसांनी शेअर केले आहेत, तर आरोपींबाबत काही माहिती असेल तर ती कळवल्यास त्यांना इनाम देण्यात येईल, अशी घोषणा देखील पोलिसांनी केली आहे, या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आरोपींना शोधण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ही घटना घडली त्याठिकाणी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली आहे.
शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोपेदेव घाट परिसरात ज्या ठिकाणी पाच दिवसांपूर्वी 21 वर्षीय एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. पाच दिवस उलटूनही आतापर्यंत आरोपीपर्यंत पोलिसांना का पोहोचता आलेले नाही? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तपासात काय अडचणी येतात याबाबत देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले. त्याचबरोबर या प्रकरणातील माहिती देखील जाणून घेतली.
‘पोलिस चौकीत पोलिस नाहीत हा प्रॉब्लेम मला शहरात अनेक ठिकाणी येतो. वर्दीची भीती नसल्याने क्राईम वाढत आहे. पोलिसांना लिंक लागत नाही त्यामुळे आरोपी सापडत नाहीत. इथ जातं येता कुठलाच कॅमेरा नाही, चौकी आग्रहाने मागितली होता, ब्लॅक स्पॉट आहे, टेक्निकल लोक कमी आहेत. ज्या दिवसापासून घटना बोपदेव घाटात ही घटना घडली, त्या दिवसापासून रोज मी एसपी आणि सीपी दोघांशी बोलत आहे, एसपीचा पण यात थोडा भाग येतो. पाच दिवस झाले आरोपी सापडत नाहीत गंभीर आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे, रात्री अपरात्री तिकडून अनेकजण जात असतात, दोघे बसले होते, त्यावेळी त्या युवतीसोबत सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला ही दुर्दैवी घटना आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत.
दरम्यान, या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून काढण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक तपासण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आली आहे. बोपदेव घाटापासून जाणाऱ्या ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही मिळविण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…
पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…
पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

