
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती…
पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित युवक सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम पोलिसांनी तयार केल्या आहेत. 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट फिरत असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पोलिसांकडून आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आली आहे. बोपदेव घाटापासून जाणाऱ्या 70 ते 80 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही मिळवण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलिस स्टेशनने प्रसिध्द केले आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन विनय पाटणकर, संपर्क क्रमांक : 8691999689 पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 युवराज हांडे संपर्क क्रमांक : 8275200947 /9307545045 किंवा नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880 यावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…
पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…
पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

