
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
पुणे: पुणे शहरातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वृध्द महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने जबरदस्ती करत, मारहाण करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
घरी पाहुणे आल्यामुळे सर्वजण बोलण्यात आणि गप्पा मारण्यात व्यस्त होते. 85 वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर चालत होती. त्या वेळी युवकाने (वय २३) वृद्ध महिलेला फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जखमी झालेली वृद्ध महिला जिन्यात विव्हळत होती. पाहुणे गेल्यानंतर घरातील मंडळी बाहेर आली. वृद्धेची शोधाशोध सुरू झाली. त्या वेळी महिलेला आपली आई जिन्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडली असल्याचे दिसले. त्यानंतर वृध्द महिलेने घडलेली घटना सांगितली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. 23) म्हाळुंगे येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित वृद्ध महिलेच्या 57 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी ओम जयचंद पुरी (वय 23, सध्या रा. साखरेवस्ती, मूळ रा. धाराशिव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इलेक्ट्रिशन म्हणून काम करतो. घटना घडली त्या दिवशी (सोमवारी) संध्याकाळच्या सुमारास पीडित वृद्ध महिला सोसायटीतील पाचव्या मजल्यावर असलेल्या आपल्या फ्लॅट समोर चालत होती. त्याचवेळी आरोपी त्या सोसायटीमध्ये होता. पाचव्या मजल्यावर असताना त्याने वृद्ध महिलेला पाहिले. मजल्यावर कोणीच नसल्याचे पाहून त्याने वृद्ध महिलेचे तोंड दाबले. वृध्द महिलेला जिन्यातून फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन बलात्कार केला. आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपीने बलात्कार करताना वृद्धेचा गळा दाबला. तसेच, वृद्ध महिलेला मारहाण केली. हा सर्व प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता. वृध्द महिलेच्या मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद देताच पोलिसांनी घटना गांभीर्यने घेत तातडीने तपास सुरू केला. चार दिवसांपूर्वी हा आरोपी सोसायटीमध्ये काम करण्यासाठी आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी हा आरोपी पुन्हा सोसायटीत कामासाठी आला. त्यावेळी त्याने हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी सोसायटीत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्याद्वारे आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार…
पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…

