
मोठी बातमी! भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त…
नवी दिल्ली: भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Opration Sindhoor)पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे.
पाकिस्तानचा भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या 15 ठिकाणी भारतीय लष्कराचे तळ लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला. आम्ही हाणून पाडला. डेब्रिज गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने 7 आणि 8 मे2025 च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने (CPMIEC) विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा (Surface-to-Air Missile – SAM) करणारी क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्तानने आपल्या ताफ्यात तिचा समावेश केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून ७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडले असून, पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. या परिस्थितीत पाकिस्तानचा मोर्तार आणि तोफगोळ्यांचा मारा थांबवण्यासाठी भारताला कारवाई करावी लागली. भारतीय सैन्य तणाव वाढवण्याच्या विरोधात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करते, परंतु ही भूमिका पाकिस्तानच्या लष्करानेही पाळली पाहिजे.
भारताची राफेल लढाऊ विमानं, सुखोई एसयू-30 एमकेआय आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ही पाकिस्तानसाठी मोठी आव्हानं ठरणार आहेत. त्यामुळेच पाकिस्ताननं HQ-9 सारख्या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पण, आता भारतानं ड्रोनमार्फत पाकिस्तानची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त केल्यामुळे आता पाकिस्तानची चिंता वाढली आहे. पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पाकिस्तानला चीनकडून मिळालेली HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर अजिबात टिकू शकत नाही. HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल, याचा विचार करणंही अशक्य आहे. S-400 ची मारा करण्याची क्षमता 400 किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. त्या तुलनेत, HQ-9 तैनात करण्यासाठी फक्त अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…
सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…
Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…
Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…
‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…
Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…
Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…
Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

