हृदयद्रावक! मुलाच्या पँटमध्ये शिरला कोब्रा अन् नको तिथे केला दंश…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका मुलगा घरात पलंगावर झोपलेला असताना कोब्रा त्याच्या पँटमध्ये शिरला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर दंश केला. मुलाला साप चावल्याचे समजताच घरात एकच गोंधळ उडाला. कुटुंबियांनी त्यालाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, त्याचा मृत्यू झाला. कणकुंड खाटांबा परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
चंदन मालवीय (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. चंदन हा रात्रीच्या वेळी जेवण करून खोलीत झोपायला गेला होता. मध्य रात्रीच्या सुमारास चंदन मोठ-मोठ्याने आरडाओरडा लागला. आपल्या पँटमध्ये साप घसुल्याचे त्याने सांगितले. चंदनचा आवाज ऐकून त्याचे काका धावत गेले. काकांनी पँटमधून साप काढायला मदत केली. आणि बाहेर आल्यानंतर मारला. शिवाय, चंदनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत सापाचे विष शरीरात पसरले होते. यामुळे चंदनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात दाखल केल्यानंतर शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. चंदनच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चदंनच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. तर चार महिन्यांपूर्वी चंदनची आई मुलीसह घरातून निघून गेली आहे. चंदन तेव्हापासून त्याच्या मोठ्या काकांकडे राहत होता. गावातील सरकारी शाळेत तो नववीत शिकत होता. चंदनला चावलेला साप हा कोब्रा जातीचा होता. त्याच्या प्रायव्हेट पार्टला साप चावला होता. विषारी साप असल्यामुळे लगेचच त्याचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पत्नी आणि चिमुकली झोपली असताना घरात सोडला कोब्रा…
प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…
मित्राचा वाढदिवस हाता साप देऊन थरारक पद्धतीने साजरा गेले अन्…
सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…
मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…