शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…

गोंदिया : एका शिक्षिकेची फेसबुकवरून अमेरिकेतील जॅक्सन जेम्स नावाच्या युवकासोबत मैत्री झाली होती. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स याने शिक्षिकेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जॅक्सन जेम्स नावाच्या युवकाने आपण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले होते. त्याने शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. पुढे ते गिफ्ट दिल्लीला आले, आता घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज पे करावे लागतील, असे सांगत शिक्षिकेला तब्बल 12 लाख 35 हजार 600 रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे.

संबंधित शिक्षिकेचे फेसबुकवर अकाऊंट असून जून 2023 मध्ये तिची जॅक्सन जेम्स या युवकासोबत मैत्री झाली होती. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स याने माझा वाढदिवस आहे. मी तुम्हाला गिफ्ट पाठवतो, तुमचा पत्ता सांगा, असे म्हणत शिक्षेकडून पत्ता मागवला आणि त्या पत्त्यावर गिफ्ट पाठवल्याचे नाटक केले.

शिक्षिकेकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर 75 हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट आणि नो-टेररिस्ट सर्टिफिकेटकरता 7 लाख 60 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. परंतु, आपल्याकडे पैसे कमी असल्याचे सांगत शिक्षिकेने 6 लाख 60 हजार रुपये पाठवले. त्यानंतर अदनान मोहिंदर नावाच्या व्यक्ती शिक्षिकेला व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन तुमच्या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंच्या किमतीच्या 10 टक्के म्हणजेच 15 लाख 45 हजार रुपये चार्जेस पेड करावे लागतील असे सांगितले. त्यानंतर शिक्षिकेने 14 जून रोजी 2 लाख 30 हजार आणि 15 जून रोजी 2 लाख 70 हजार रुपये चेकद्वारे अदनान मोहिंदरने पाठवलेल्या अकाऊंटवर पाठवले. एकूण 12 लाख 35 हजार 600 रुपये त्यांच्याकडून उकळून त्यांची फसवणूक केली.

दरम्यान, शिक्षिकेला आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर गोरेगाव पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम 420, 34 सह कलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.

श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…

पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…

मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…

सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!