अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
अश्विनी देवरे या पोलिस दलामध्ये गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्य बजावत असताना कझाकिस्तानमध्ये झालेल्या अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला आयर्नमॅन होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. शिवाय, सातासमुद्रापार तिरंगा मानाने फडकाविला आहे. लहानपणापासून अत्यंत खडतर प्रवासातून जिद्दीने त्या पुढे जात आहेत. जिद्द म्हणजे नेमके काय असते? हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. पती लष्करात असताना पोलिस दलातील नोकरी, खेळ सांभाळत असतानाच माता म्हणून त्यांनी दोन मुलांना घडवले आहे. अश्विनी देवरे यांची प्रचंड प्रेरणादायी कथा आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात…

अश्विनी देवरे यांचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेडा हे गाव. शेतकरी कुटुंबातील जन्म. तीन बहिणी, एक भाऊ आणि आई-वडील असा परिवार. जिरायती शेती. बहीण-भावाने मिळून दोघांनीच विहीर खोदली आणि पाणी लागले. शाळेत असताना मॅरेथॉनमध्ये दोन्ही बहिणी प्रथम आल्या आणि खेळ हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला. पोलिस दलात पहिल्याच प्रयत्नात भरती झाल्या. देश, आतंरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार मिळवून पोलिस दलातील त्या पहिल्या महिला आयर्नमॅन बनल्या आहेत.

संघर्षमय जीवन..
अश्विनी देवरे यांचे बालपण जायखेडा गावात गेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे लहान असल्यापासून त्यांना मोठ्या कष्टाला सामोरे जावे लागले. शाळेमध्ये असतानाच त्या आठ रुपये रोजाने दिवसभर मजुरीने काम करायला जायच्या. कोरडवाहू शेतीची रात्रंदिवस मशागत सुरू केली. बहीण-भावाने मिळून पौर्णिमेच्या रात्री जिद्दीने विहीर खोदायला सुरुवात केली. कष्टाला यश आले आणि विहिरीला दहा फुटांवरच पाणी लागले. कुटुंबाला मोठा आनंद झाला आणि जिरायती शेती बागायती होऊ लागली. लहानपणी घरामध्ये टीव्ही नसल्यामुळे फक्त अभ्यास, खेळ आणि काम एवढेच माहीत होते. या गोष्टींचा पुढे आयुष्यात मोठा फायदा झाला.

शाळा आणि मॅरेथॉन…
गावामध्ये शिक्षण घेत असताना खेळाविषयी क्रीडाशिक्षक खैरनार सर यांच्याकडून माहिती मिळत गेली. शाळेमधील मुलींना खेळामध्ये इच्छा असून, खेळात भाग घेता येत नव्हता. त्यामुळे एकमेव मुलगी म्हणून त्या मुलांमध्ये खेळू लागल्या. गावामध्ये छोट्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दोघी बहिणी पहिल्या आल्या होत्या. पुढे शाळेकडून त्यांनी खेळायला सुरुवात केली. परंतु, एकमेव मुलगी असल्यामुळे शाळेतून क्रीडाशिक्षक घेऊन जाण्यास नकार देत. सरांचे पाय धरले आणि मला देशासाठी खेळायचे आहे, असे सरांना सांगितले. सरांनी विश्वास दिला आणि पुढे खेळाची संधी मिळत गेली. शाळेत असतानाच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती. खेळाबरोबरच भाषणाचीसुद्धा आवड होती. एकदा शाळेत असताना भाषण केल्यानंतर ११ रुपयांचे बक्षीस मिळाले होते. बक्षिसाने भारावून गेल्या आणि पुढे खेळ, बक्षिसे आणि पुरस्कार मिळतच राहिले. ती सुरुवात आजपर्यंत चालू आहे.

नाशिक आणि शूज…
भारताच्या वेगवान धावपटू पी. टी. उषा यांच्याविषयी शाळेत असतानाच माहिती मिळाली होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेत पळण्याच्या शर्यतींमध्ये सहभाग घेत असतानाच पहिला क्रमांक मिळवू लागल्या. शालेय शिक्षण घेत असताना अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आणि क्रमांकही पटकावला. पण, धावण्याच्या स्पर्धेमध्ये पळाल्या त्या अनवाणी पायाने. नाशिक शहरात आल्यानंतर पळताना शूज वापरतात हे प्रथमच समजले. तोपर्यंत शूज हा कधी पायाला लागलाच नव्हता.

पोलिस दलात भरती…
शाळेमध्ये असताना नोकरीसाठी एम्प्लॉयमेंटमध्ये नाव नोंदवले होते. पोलिस भरतीसाठी एम्प्लॉयमेंटचा कॉल आला होता. शाळेत असल्यापासून खेळ आणि कष्टाची सवय असल्यामुळे भरतीदरम्यान त्याचा फायदा झाला. पहिल्याच प्रयत्नात म्हणजे वयाच्या १८व्या वर्षीच पोलिस दलात भरती झाल्या. एक मोठे स्वप्न साकार झाले. लहानपणी देशसेवेचे पाहिलेले स्वप्न पोलिस दलात राहून पूर्ण करता येणार असल्याचा मोठा आनंद झाला होता. पोलिस दलात भरती झाल्यानंतर आई-वडिलांना आनंद तर झालाच, पण गावामध्येही सन्मान मिळू लागला. पुढे तर बहीण सुद्धा पोलिस दलात भरती झाली.

पाच वर्षांच्या मुलाने शिकवले पोहायला…
अश्विनी देवरे या लहानपणापासून विविध खेळांमध्ये अग्रेसर आहेत. परंतु, त्यांना पोहता येत नव्हते. आयर्नमॅन पुरस्कार मिळवायचा असेल तर स्वीमिंग, सायकलिंग, रनिंग आवश्यक आहे. नाशिकचे माजी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघ यांनी आयर्नमॅन पुरस्कार मिळविला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेत हा पुरस्कार मिळविण्याची जिद्द होती. मोठा मुलगा अनिकेत हा पाच वर्षांचा होता. अनिकेत याने आईला पोहायला शिकवले आणि आई आज थेट समुद्रात पोहत आहे. शिवाय, कोणत्याही कोचची मदत न घेता आजारी असतानाही आयर्नमॅन पुरस्कार मिळवला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनकडून सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला आहे.

संपूर्ण कुटुंबच मेडलिस्ट…
आश्विनी देवरे यांचे संपूर्ण कुटुंबच मेडलिस्ट आहे. भारतीय लष्करात नायब सुभेदार या पदावर कार्यरत असलेले त्यांचे पती गोकूळ देवरे हे सुद्धा उत्कृष्ट धावपटू आहेत. मुलगा अनिकेत (वय १४) व शौर्य (वय १०) या दोन्ही मुलांनीही राजस्थानमधील अल्वार येथे झालेल्या राष्ट्रीय अॅथलेक्टिक्स स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!