
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
पुणे: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. गणपतीचं दर्शन घेऊन घरी परत जात असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिली. या घटनेत पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम परिसराजवळ शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री एक वाजता घटना घडली आहे. हा भीषण अपघात झाला आहे. घटनेनंतर डंपर चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. त्याच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सूर्यवंशी आणि प्रिया सूर्यवंशी यांचे आठच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
अनिल सूर्यवंशी आणि प्रिया सूर्यवंशी हे दोघे रात्री उशिरा गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या दुचाकीवरून भूगाववरून भुकूमकडे परतत होते. त्यावेळी एक डंपर चालक भरधाव वेगाने जात होता. या डंपरने सूर्यवंशीच्या दुचाकीला जोरात धडक दिली. पती-पत्नी दोघेही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. डंपर चालकाने या घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे या पती-पत्नींना उपचार न मिळाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया सुर्यवंशी या मैञिणीबरोबर पुण्यात गणपती बघायला गेल्या होत्या. त्या राञी भुगांव येथे आल्या. त्यांना घेण्यासाठी त्यांचे पती अनिल हे लवळे फाटा येथून भुगावला आले होते. प्रिया यांना अनिल यांनी दुचाकीवर ( एमएच १२ टिएक्स ०३९५ ) घेऊन लवळे फाट्याकडे जात असताना मध्यराञी एक वाजता भुकूमकडून भुगावकडे निघालेल्या डंपरने (नंबर एमएच १४ एलजी ७९११ ) हॉटेल गारवा समोर जोरदार धडक दिली. यामध्ये अनिल आणि प्रिया यांच्या डोक्यातून रक्ताचे रस्त्यावरून अक्षरशः पाट वाहत होते. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर डंपर चालकाने तेथून पळ काढला. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते.
अनिल आणि प्रिया यांचा आठ महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. अनिल हे उरवडे रोडवरील एका कंपनीत तर प्रिया या भुगावला एका शाँपमध्ये कामाला होते. दोघांच्या मनमिळावू स्वभावामुळे झालेल्या आपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण हे करीत आहेत.
पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…
शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…
Video: ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल…
Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

