लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापेमारी; मुद्देमालासह फरार आरोपी जेरबंद…

लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर छापेमारी केली. जुगार, दारूबंदी कायद्यान्वये 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करुन 07 लाख 6 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, 06 वर्षापासून फरार असलेला लूटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 07/08/2023 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औराद शहाजनी पोलिस ठाणे हद्दीतील औराद शहाजानी ते कोटमाळ रोड लगत अशोक भंडारे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा मारला असता तेथे
1) अंकुश अशोक भंडारे, वय 30, वर्ष, राहणार औराद शहाजानी, तालुका निलंगा.
2) हनुमंत परशुराम बिराजदार, वय 34 वर्ष, राहणार औराद शहाजानी तालुका निलंगा.
3) अतुल मोहनराव भंडारे, वय 22 वर्ष, राहणार औराद शहाजानी झोपडपट्टी, तालुका निलंगा.
4) फयाज हुसेन नाईकवाडे, वय 24 वर्ष, राहणार कोटमाळरोड, औराद शहाजानी, तालुका निलंगा

स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईलफोन व वाहने असा एकूण 98 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नमूद आरोपींचे विरोधात पोलिस ठाणे औराद शहाजनी येथे कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास औराद शहाजानी पोलिस करीत आहेत.

दिनांक 07/08/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने आणखीन एक कार्यवाही करत पोलिस ठाणे गांधीचौक येथे सन 2017 मध्ये दाखल असलेल्या कलम 393, 398 मधील लूटमार करणाऱ्या गंभीर गुन्ह्यात 6 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अतिशय शिकाफिने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलिस ठाणे गांधी चौक यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे.

दिनांक 08/08/2023 रोजी पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंद्यावर कारवाई करत देशी-विदेशी दारूची अवैध विक्रीसाठी एका कारमधून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तोंडारपाटी ते उदगीर जाणारे रोडवर सापळा लावून अवैध दारू वाहतूक करणारा आरोपी 1) गोविंद नामदेव बनसोडे (वय 32, राहणार लोहारा, तालुका उदगीर) यास दारूचा मुद्देमाल व स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 6 लाख 7 हजार रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकाने कारवाई करत फरार आरोपीला अटक करुन अवैध धंद्यावर छापेमारी केली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पथकातील पोलिस अंमलदार राहुल सोनकांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, संतोष खांडेकर, नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, केंद्रे यांनी केली आहे.

लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…

लातूर जिल्ह्यात मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना एलसीबीने केली अटक…

लातूर एलसीबीकडून सराईत गुन्हेगारांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

बकऱ्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!