
Video News: पोलिसकाकाच्या Top 10 बातम्या…
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
विश्वविजेत्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
मुंबईः विश्वविजेती टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिस सज्ज आहे. त्याशिवाय काही वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
कोल्हापूर दोन सख्ख्या भावांचा विजेचा धक्का लागून मृत्यू
कोल्हापूरः कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कुडीत्रे गावात शेतात काम करत असताना विजेचा शॉक बसून दोन सख्खा भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील आणि सुहास पाटील अशी मृत भावांची नावे आहेत.
मुंबईत स्पायडर मॅन स्टाईलमध्ये चोरी करणाऱ्याला अटक
मुंबईः मुंबईतील स्पायडर मॅन स्टाईलमध्ये शहरातील उंच इमारतींवर चढून चोरी करणाऱ्याला कांदिवली पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आरोपी स्पायडर मॅनने 2 आठवड्यात मुंबई उपनगरात पाईपवर चढून तब्बल 11 चोरी केल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश
मुंबईः मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. आरोपींकडून 8 पिस्तूलसह 138 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहे. जुहू परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
अंत्यसंस्कार केलेली महिला ‘लाडली बहीण योजने’चा लाभ घेताना सापडली!
भोपाळ: मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र आता नोएडामध्ये ती महिला सापडली असून, मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेचे पैसे घेताना ती पकडली गेली आहे. यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आलेला मृतदेह कोणाचा हा प्रश्न पुढे आला आहे.
कर्नाटकमध्ये पोलिसांना घाबरून पळताना 6 जणांचा बुडून मृत्यू
बंगळूरः कर्टकमधील विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुने बळोती येथे कृष्णा नदीच्या काठावर जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना घाबरून काही जणांनी पळ काढला. पळ काढताना गोलाकार बोटीत बसून जाणारे सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला आता फसवणूक प्रकरणी अटक
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातून जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अग्रवालवर हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये सोसायटीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्याच प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी त्याला येरवडा तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी अटक केली आहे.
कोंढवा पोलिसांकडून अट्टल गुन्हेगारास अटक
पुणेः पुणे शहरात दिवसा व रात्री घरफोडया करणा-या अट्टल गुन्हेगारास कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी विविध गुन्हे उघड केले आहेत.
पुणे शहरात खुनातील दोन आरोपींना अटक
पुणेः पुणे शहरात आंतरधर्मीय विवाह केला रागातून युवतीच्या वडिलांचा खुनातील दोन आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबईत दाऊदची ड्रग्ज फॅक्टरी, 327 कोटींचे MD जप्त
ठाणे : मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तल्याच्या गुन्हे शाखेने तब्बल 350 कोटी रुपयांचे एमडी व 4 शस्त्रे, जिवंत काडतूस व इतर अमली पदार्थ बनवण्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

