संजय कपूर यांचे निधन; करिष्माच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण…

मुंबईः अभिनेत्री करिष्मा कपूर हिचा घटस्फोटीत पती संजय कपूर (वय ५३) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. पण, त्यांच्या मृत्यूमागे फक्त हार्ट अटॅक हे एकमेव कारण नाहीतर, आणखी एक धक्कादायक कारण समोर आले आहे. संजय कपूर लंडनला पोलो खेळत असताना त्यांना मधमाशी चावली आणि त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला, अशी माहिती पुढे आली आहे.

अभिनेत्री करिष्मा कपूर हिचा घटस्फोटीत पती आणि बिझनेसमन संजय कपूर यांच्या निधनाच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला आहे. लंडनमध्ये पोलो खेळत असताना हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पण, मीडिया रिपोर्टनुसार, संजय कपूर लंडनमध्ये पोलो खेळत असताना एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली आणि तिने चावा घेतला. त्यानंतर संजय कपूर यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, करिष्मा कपूर हिच्यापासून वेगळे झाल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव सोबत विवाह केला होता. अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि शोक व्यक्त केला आहे. संजय कपूर यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला धक्का बसला आहे.

करिष्मा कपूर हिने संजय कपूर यांच्यासोबत आपली लग्नगाठ बांधलेली. पण, लग्नाच्या 13 वर्षांनी दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटावेळी करिष्मानं संजय कपूर यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले होते. करिष्मा हिने संजय कपूर यांनी तिचा शारीरिक छळ केल्याचा दावा केला. तसेच, संजय कपूर यांनी त्यांच्या मित्रांसोबत आपला सौदा केल्याचे आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही दावा केला होता. त्यानंतर दोघांच्या घटस्फोटावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला आणि दोन्ही मुलांची जबाबदारी करिष्मा कपूर हिच्याकडे दिली गेली.

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!