नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा मोठी अपडेट…

दापोली : नीलिमा चव्हाण मृत्यू नंतर तिच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला असून, स्टेट बँकेच्या दापोली शाखा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पण, शवविच्छेदन अहवाल आणि विसेरा रिपोर्टमधून घातपाताची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नीलिमा चव्हाणचा मृतदेह दाभोळ खाडीत १ ऑगस्ट रोजी आढळला होता.

चिपळूण तालुक्यातील ओमळी गावातली नीलिमा चव्हाण ही दापोलीत स्टेट बँकेच्या शाखेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होती. गावी जात असल्याचे सांगून ती निघाली होती. त्यानंतर दापोली खेड आणि खेड चिपळून एसटीने तिने प्रवास केल्याचेही समोर आले. त्यानंतर भरणे नाका इथून जुन्या वापरात नसलेल्या पुलाकडे ती चालत गेली होती.

नीलिमा कामाला असलेल्या शाखा अधिकाऱ्यांकडून तिला कामाचे अधिक टार्गेट दिले गेले होते. शिवाय, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप कर्मचाऱ्यावर लावला आहे. बँकेच्या शाखा अधिकाऱ्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जास्त कामाचे टार्गेट आणि मानसिक छळ केल्यामुळे आत्महत्या केली असावी का यादृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत.

दरम्यान, नीलिमाचा मृतदेह आढळला तेव्हा तिच्या डोक्यावर अन् भुवयांवर केस नव्हते. त्यामुळे तिच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. पण विसेरा रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवालात तिच्या घातपाताची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नीलिमा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक कारण आले समोर…

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…

बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…

पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…

धक्कादायक! राजगडावर अजयचा मृतदेह पाहून मित्र घाबरले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!