
ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला; गुन्हा दाखल…
अकोलाः कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या युवतीच्या ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर युवतीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. उमेश सांगळे असे हल्ला झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
पातूर तालुक्यातील पेडका पिंपरडोळी गावाजवळ मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसावर हल्ला केला आहे. पोलिस उमेश सांगळे यांच्या सतर्कतेमुळे या घटनेतील प्रेमविवाह केलेली युवती बचावली आहे. दरम्यान, या घटनेत मुलीची आई आणि दोन भाऊ अशा तिघांवर अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामांत अडथळा निर्माण करण्याचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना चान्नी पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…
सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…
सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…
प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…

