
पंकजा मुंडे यांचा पी.ए. अनंत गर्जे पत्नी प्रकरणी न्यायालयात ट्विस्ट…
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गौरीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. न्यायालयात आज (गुरुवार) याबाबत सुनावणी झाली. अनंत गर्जे याच्या पोलिस कोठडीत वाढ झाली असून, 2 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनंत गर्जे याची कोठडी संपल्यानंतर पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टात सरकारी वकिलांनी मोठा दावा केला आहे. अनंत आणि त्याची पत्नी गौरी या दोघांच्या अंगावर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे या जखमा कशा आल्याचा याचा तपास करणयासाठी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. छापील अहवालात गौरीच्या अंगावर जखमा असून, मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने तपास करायचा आहे. सीसीटीव्ही अनुषंगाने देखील तपास करायचा आहे. अहवालात आलेल्या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या त्यासंदर्भात विचारायचे आहे, असे पोलिस म्हणाले.
अनंत गर्जे याचे वकील मंगेश देशमुख प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘रिमांड रिपोर्ट मध्ये गौरीच्या शरीरावर जखमा आहेत असा कुठेच म्हटले नाही. गौरीच्या शरीरावर जखम नाही. अनंत गर्जे यांच्या 28 जखमा जुन्या आहेत. ही वेळ योग्य नाही माध्यमांसमोर गोष्टी बोलण्यासाठी नाही. रेकॉर्डिंग ऐकलेली नाही पण अनंत गर्जे यांनी दोन्ही मोबाईल देऊन टाकले आहेत. गौरी आणि त्यांचे जे कॉल झाले आहेत त्याचे रेकॉर्डिंग आहे.
दरम्यान, आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंतचे भांडण झाले होते. यानंतर अनंत पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला. अनंतची कार कोस्टल रोडला असताना त्याने वारंवार गौरीला फोन केला. मात्र, गौरीने फोन उचलला नाही. अनंतने कार पुन्हा घराकडे वळवली. घराबाहेरून आवाज देऊनही गौरी दार उघडत नव्हती. आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्याने अनंतने खिडकीतून घरात डोकावले. यावेळी गौरीने गळफास घेतल्याचे दिसून आले आहे. पोलिस तपासात आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गौरी पालवे यांच्या वडिलांच्या आरोपामुळे पंकजा मुंडेंच्या पीएच्या वाढल्या अडचणी…
अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार…
गौरी पालवे-गर्जे यांना सापडलेल्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा…
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

