पुणे! पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे : पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना समर्थनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अतुल मारुती कदम (३९, रा. बालाजी कॉम्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोनाली अतुल कदम (३१, रा. साडेसतरानळी, हडपसर, पुणे) आणि मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. पत्नी आणि तिचा मित्र वेगवेगळ्या कारणांवरून सतत त्रास देत असल्याने अतुलने 15 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत अतुल यांची आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

मृत युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा सन २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून सातत्याने वाद सुरू होते. अतुलला पत्नी सोनाली हिचे कृष्णा शिंदे याच्याशी जवळचे मैत्रीसंबंध असल्याचे समजल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. यानंतर पत्नी सोनाली माहेरी राहायला गेली होती. परंतु, त्यानंतर सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा यांनी अतुलला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर फोन करून त्यास सतत धमकावण्यात येत होते. पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे अतुल यांनी मागील महिन्यात १५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेतला. पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे मुलगा अतुलने आत्महत्या केल्याचे आई माधुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! मैत्रिणीला दिवस गेल्याचे कळल्यानंतर रबडीतून दिली गोळी अन् अनेकींसोबत संबंध…

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…

पुणे! म्हातारा रिसेप्शनिस्ट युवतीला म्हणाला; मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो…

पुणे कोंढवा प्रकरणात नवा ट्वीस्ट, प्राध्यापिकेची एन्ट्री…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!