भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…

मुंबई : अशोक खरात प्रकरणात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, संबंधित महिलांची ओळख समोर येत आहे. या प्रकरणात पोलिस आता योग्य ती कारवाई करत असून नगर आणि नाशिकमध्ये काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

अशोक खरात प्रकरणात अनेक सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आहेत. सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत ते अशोक खरात याच्या ऑफिस बॉय आणि इतरांकडून बाहेर आले आहेत. अशोक खरात आतापर्यंत ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्यावरून मुख्यमंत्र्यांनी किती भक्कम भूमिका घेतली आणि नंतर पोलिसांनी कशी कारवाई केली हे समोर येते. या प्रकरणात पोलिस जलदगतीने तपास करतील आणि आरोपीला योग्य ती शिक्षा मिळेल, असेही संदीप कर्णिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अशोक खरात प्रकरणातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यासाठी पोलिस दोषी आहेत का असा प्रश्न कर्णिक यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना कर्णिक म्हणाले की, ‘कोणताही व्हिडीओ पोलिसांकडून व्हायरल झालेला नाही. खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयने हे व्हिडीओ काढले होते. त्याच्या माध्यमातून हे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. त्या ऑफिस बॉयने त्याच्या जीवाच्या भीतीने काही व्हिडीओ लपवून ठेवले होते. नंतर ते व्हिडीओ बाहेर आले. काही लोकांनी मूळचे व्हिडीओ मॉर्फ करत त्या ठिकाणी इतर महिलांचे व्हिडीओ टाकले असून, अशा प्रकरणात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून कारवाई सुरू आहे.’

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे संबंधित महिलांची ओळख होत आहे. त्यावर कारवाई सुरू आहे. त्यासाठी नगर, नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले असून अनेक अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत. खरात हा शातीर गुन्हेगार आहे. जोपर्यंत त्याच्यासमोर आम्ही भक्कम पुरावे आणि फॅक्ट्स ठेवत नाही तोपर्यंत त्याची स्टोरी सांगत जाणार. त्याने अनेक कहाण्या तयार केलेल्या आहेत, पण आम्ही त्याला पुराव्यांच्या आधारे गुन्हे मान्य करण्यास भाग पाडू. अशोक खरातने त्याच्या फार्म हाऊसवर नरबळी आणि प्राण्यांची बळी दिल्याची चर्चा आहे. अधिक तपास केल्यानंतर माहिती समोर येईल,’ असेही संदीप कर्णिक म्हणाले.

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!