लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…

लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या (गोवंश) बैलांची अवैध वाहतूक करीत असलेला आयशर ताब्यात घेण्यात आला असून, 15 बैलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक लातूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा 30/07/2023 रोजी रात्री शोध घेत होते. पथक रात्री 2 वाजण्याचे सुमारास पोलिस ठाणे अहमदपूर येथे पोचले असता पथकाला मिळालेल्या माहितीवरून गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन थांबवले. असता सदर वाहनांमध्ये (गोवंश) 15 बैल ज्याची किंमत अंदाजे सात लाख पन्नास हजार रुपये असे गोवंश 15 बैल आयशर टेम्पोमध्ये कोंबून, कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

सदर आयशर कंपनीच्या चालकाकडे व सोबत असलेल्यांना विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
1) सलमान उस्मान शेख (वय 30 वर्ष, राहणार घाटनांदुर तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर).
2) जावेद बुडन शेख (वय 30 वर्ष, राहणार बोरगाव सारणी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर).
3) जाकीर अब्दुल अजीज शहा (वय 23 वर्ष, राहणार बोरगाव सारणी, तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर). असे असल्याचे सांगितले.

आरोपींनी अवैधरित्या गोवंश, बैल एकूण 15 बैल (ज्याची किंमत अंदाजे 7 लाख 50 हजार रुपये) अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने आयशर टेम्पो ( किंमत 15 लाख) असा एकूण 22 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिस ठाणे अहमदपूर येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस अंमलदार राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, राहुल कांबळे तसेच अहमदपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी केली आहे.

लातूर जिल्ह्यात मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना एलसीबीने केली अटक…

लातूर एलसीबीकडून सराईत गुन्हेगारांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!