पाचव्या प्रयत्नात IPS! ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले होते एक कोटी…
नवी दिल्ली : देशातील अनेक युवक-युवती UPSC ची परीक्षा देऊन IAS, IPS होण्याचे स्वप्न पाहतात. यामध्ये काही जणांना यश येत असते तर काही जणांना अपयश. पण, अपयश ही यशाची पहिली पायरी समजली जाते. हिमाचल प्रदेशात असलेल्या मोहिता शर्मा यांनी पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवले होते. शिवाय, त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक कोटी रुपये जिंकले होते. त्यांच्या विषयी थोडक्यात…
मोहिता शर्मा या मूळच्या हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील मूळ रहिवासी आहेत. पुढे त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले. वडील कंपनीत नोकर करत तर आई गृहिणी होती. मोहिता यांनी 10वी मध्ये 92.20% आणि 12वीमध्ये 90.70% गुण मिळवले होते. पुढे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) डिग्री घेतली. शिवाय, यूपीएससी परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. चार वेळा अपयश आल्यानंतर पाचव्या प्रयत्नात त्यांना यश आले. त्यांनी UPSC परीक्षेत 262वा क्रमांक मिळवला आणि IPS झाल्या.
मोहिता शर्मा यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या शोमध्ये त्यांनी बिग बींनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन तब्बल 1 कोटी रुपये जिंकले होते. त्यांच्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने प्रभावित झालेल्या अमिताभ बच्चन यांनी मोहिता यांचे मनापासून कौतुक केले होते.
मोहिता शर्मा यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. चार वेळा अपयश आल्यानंतरही त्या खचून गेल्या नाहीत तर त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि पाचव्या प्रयत्नात यश मिळवून त्या IPS अधिकारी झाल्या. त्यांचा प्रवास UPSC परीक्षेत विजय मिळवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या असंख्य व्यक्तींसाठी आशेचा किरण आणि प्रेरणा देणारा आहे.
दरम्यान, ‘पोलिसकाका’ दरवर्षी पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर पुस्तक काढत आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी पुस्तकाला अनेकांची मागणी आहे.
अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!
शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…