
पंढरपूरमधील युवतीवरील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट…
पंढरपूर: पंढरपूर शहरात युवतीवर ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर युवतीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयक्तिक कारणातून घडला आहे. युवतीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव तिने रचला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी केली. तसेच पीडित तरुणीचे जबाब नोंदवले. मात्र, तिने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अखेर त्या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पोलिसांनी सांगितलं की, पिडीत युवती आणि तिच्या आईने आम्हाला तिच्यावरती अज्ञाताने ॲसिड हल्ला केला असल्याचे सांगितले होते. परिसरातील सीसीटिव्ही तपासले त्यानंतर जबाब नोंदवले, यावेळी आम्हाला युवतीच्या जबाबात तफावत आढळली, त्यानंतर तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. चौकशीत ही सर्व माहिती समोर आली आहे.’
धक्कादायक! पंढरपुरात युवती भेळ खाऊन निघाली अन् झाला ॲसिड हल्ला…
पंढरपूर हादरलं! नगरसेवकाकडून 3 जणांवर कोयत्याने सपासप वार, कारण समोर…
पंढरपूरमधील दुहेरी हत्याकांडाची सूत्रे IPS प्रशांत डगळे यांनी हातात घेतली अन् ठोकल्या बेड्या…
पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….
पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…

