
महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर ठेचून केली हत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात महाराष्ट्र दिनी एक अतिशय धक्कादायक आणि संताप जनक घटना घडली आहे. नसरापूर येथे साडेतीन वय वर्ष असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.
ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला आमच्या हातात अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी आंदोलकांना स्वतः पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. सध्या भोर तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांचा तूर्तास रास्ता रोको स्थगित केला आहे. आरोपी विरोधात 15 दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. मात्र या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
चिमुकली नसरापूरला तिच्या आजीकडे सुट्टी निमित्त राहावयास आली होती. दुपारच्या सुमारास नसरापूर राम मंदिर परिसरात खेळत असताना तिला आमिष दाखवून तिथून जवळच असलेल्या एक गुरांच्या गोठ्यात नेऊन निर्दयीपणे अत्याचार केला. त्यानंतर नराधमाने तिचा दगडाने ठेचून खून केला. दरम्यान, मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेतला. परंतु ती सापडून आली नाही. दरम्यान परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तपास केला असता सदर व्यक्ती समवेत ती एका आडबाजूला जात असल्याचे दिसले. यावरून त्या भागात कुटुंबियांनी शोध घेतला असता तिचा एका गोठ्यामध्ये झाकलेले अवस्थेत मृतदेह आढळला. यावरून नागरिकांनी ज्या व्यक्ती बरोबर ती गेली होती त्या व्यक्तीचा शोध गावाच्या परिसरात घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो गावच्या नदीकडील भागात सापडला. दरम्यान, त्याला पकडून आणून मुलगी कुठे आहे? तु काय केलस? असे विचारले असता त्याने मी काही केले नाही असे उत्तर दिले. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या व्यक्तीस ताब्यात घेतले.
संतप्त नागरिकांनी नराधमास आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. या संतापजनक घडलेल्या घटनेमुळे समस्त नसरापूरमधील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी मृतदेह हलवण्यास नकार देऊन सदर नराधमास ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावे, आम्ही त्याला शिक्षा देऊ, अशी मागणी करत पोलिसांना अडवून धरले.
पुणे! आळंदीत चिमुकली आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या…
सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बापाने घेतला चिमुकलीचा बळी…
पुणे! चिमुकली पाळण्यात निपचित पडलेली तर पत्नीच्या गळ्याला दोर…
महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश…
बीड हादरलं! बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, वडिलांचा मृतदेह…

