
अमरावतीच्या मोहम्मदला अटक, १८० तरुणींचे लैंगिक शोषण अन् ३५० Video…
अमरावती : अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याने १८० युवतींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यानंतर सूत्रे फिरवून पोलिसांनी आरोपीला अटक केली. १८० युवतींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीरवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक करून आरोपीला न्यायालयात हजर केले. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला 21 एप्रिलपर्यंत म्हणजे 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन, तपासाला सुरुवात केली आहे. अनेक धक्कादायक अश्लील व्हिडीओ मोबाईलमध्ये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरोपीचे युवतींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोबाईलमधील अनेक डेटा आरोपीने डिलीट केला आहे. तो आता सायबरच्या मदतीने रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार एक वर्षापासून सुरू असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपीने आतापर्यंत सात पीडित मुलींची नावे सांगितली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अमरावतीत तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीवर गुन्हा दाखल…
मुंबईत Live कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस, युवक-युवतीचा मृत्यू…
पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…
प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…
महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…

