
पतीच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल…
चित्रदुर्ग (कर्नाटक): एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जदारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नी रंजिता हिने (वय २३) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
दर्शन बाबू आणि रंजिताचं 2020 मध्ये लग्न झाले होते. दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दर्शन बाबू हा अभियंता असून त्याला सट्टेबाजीचे व्यसनच आहे. तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असून, 2021 पासून आयपीएलमध्ये पैसे गुंतवत होता. सट्टेबाजीत पैसे गमावल्यानंर किंवा नव्याने सट्टा लावण्यासाठी तो कर्ज घेत असे. कर्जदारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने 18 मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने 1 कोटींचं कर्ज घेतले होतं.
दर्शन बाबू हा 2021 ते 2023 या कालावधीत आयपीएल सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकला होता. त्याच्या या व्यसनाचा परिणाम कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर झाला. त्याने सर्व पैसे गमावल्यानंतर सट्टा लावण्यासाठी 1.5 कोटीहून अधिक कर्ज घेतले होते. त्याने यातील 1 कोटी रुपये परत केले होते. पण तरीही अद्याप त्याच्यावर 84 लाख रुपयांचे कर्ज होते.
रंजिताचे वडील वेंकटेश यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ‘कर्जदारांच्या सततच्या छळामुळे आपली मुलगी अत्यंत व्यथित होती आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली. त्यांनी 13 जणांची नावंही सांगितली आहेत ज्यांनी कथितरित्या पैसे दिले होते. दर्शनची सट्टेबाजी करण्याची इच्छा नव्हती. पण संशयितांनी त्याला लवकर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवत यात ओढले. त्यांनी त्याच्याकडून काही कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षरी घेत सट्टेबाजीसाठी पैसा पुरवण्याचे आश्वासन दिले होते.’ दरम्यान, पोलिसांना तपासदरम्यान सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये रंजिताने आपला छळ झाल्याचे सविस्तरपणे लिहीले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…
Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…
हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…
खजिना सापडल्याचे सांगून लुटले अन् तिघांना जिवंत जाळले…
प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…

