प्रेम प्रकरण! पती-पत्नी म्हणून ओयो हॉटेलमध्ये आले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रयागराज शहरापासून सुमारे ५० किलोमीटर लांब सोराव या गावाजवळ असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये सुमन देवी (वय ३५) या महिलेची प्रियकराने हत्या केली. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर विवेक कुमार हा स्वतःच पोलिस स्टेशनला आला आणि हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विवेक कुमार याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह ओयो हॉटेलमध्ये असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनाही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यासह ओयो हॉटेलला भेट दिली. तेव्हा त्याच्या प्रेयसीचा मृतदेह बेडवर होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी विवेक कुमार हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.

सोरावचे पोलिस अधीक्षक जंग बहादूर यादव म्हणाले, ‘महिला आणि आरोपी हॉटेलमध्ये कधी आले, त्यांनी कोणती ओळखपत्र देऊन खोली बुक केली होती याबाबत ओयो हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी करत आहोत. मृत महिलेच्या कुटुंबालाही या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सुमन देवी ही सराय गोपाल भदरी गावची रहिवासी आहे. १० वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले आहे. तिचा नवरा बलकरनपूर गावचा रहिवासी होता. नवऱ्याशी पटत नसल्यामुळे ती माहेरी राहात होती. रविवारी दुपारी ती विवेक कुमारबरोबर शिवगड असलेल्या येथील हॉटेलवर आली होती. विवेक आणि सुमन यांनी नवरा-बायको असल्याचे सांगून खोली बुक केली होती. त्या दोघांमध्ये लग्नाबाबत वाद सुरू होता. सुमन आपल्याकडे पाच लाख रुपये मागत होती. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार करेन, अशी धमकीही देत होती. विवेक हा सुमनपेक्षा १० वर्षांनी लहान असून, अनेक वर्षांपासून त्यांच्यात संबंध होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवविवाहितेने दाजिला शेवटचा मेसेज करून घेतला जगाचा निरोप…

प्रेम! वहिनीने काढला दीरासोबत पळ; घरच्यांनी पकडलं अन्…

युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…

प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…

वहिनी आणि दिराचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!