
कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरणानंतर मोठी खळबळ; आरोपीचा व्हिडिओ…
कोल्हापूर : नाशिक, अमरावतीनंतर कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरण पुढे आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शाहीद समीर सनदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
शाहीद सनदे याने महाविद्यालयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केले. मित्रासोबत मिळून त्याचे व्हीडिओ केले. तसेच ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो युवतींना देत होता. काही व्हिडिओ मित्रांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकरणी एका पीडित युवतीने कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पुढे आले. पोलिसांनी तत्काल तपासाची चक्रे फिरवत शाहीद याला ताब्यात घेतले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
आरोपी शाहीद सनदे हा सध्या अटकेत आहे. मात्र, त्याचा अटक होण्यापूर्वीचा एक माफी मागणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आरोपी हा आपण अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवल्याचे मान्य करत आहे. तसेच त्याचे व्हिडिओ व फोटो काढल्याचेही त्याने कबूल केले आहे. या कृतीबद्दल मला पश्चात्ताप होत असून, आपण त्या सर्वांची माफी मागतो व यापुढे असे कृत्य करणार नसल्याचे सांगत आहे.
दरम्यान, संबंधित व्हिडिओ अटकेपूर्वीचा असून तो कारमध्ये केल्याचे दिसत आहे. व्हिडिओत शाहीद भेदरलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ नेमका कधी काढला? याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून आरोपी आत असताना व्हिडिओ बाहेर कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…
अमरावती व्हिडीओकांड प्रकरणील आरोपीचा ‘गुरूमंत्र’ ठरलेला ‘आप वही हो ना?…
अमरावती प्रकरण! कोण जास्त मुली पटवणार लागली पैज अन् फुटलं बिंग…
अमरावतीत तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीवर गुन्हा दाखल…
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं अन् लैंगिक शक्तीच्या गोळीनं गेला जीव…

