पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. 9) घडली आहे. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर पतीने संशयातून पत्नीची हत्या केली आहे. विमानतळ पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

रुपाली उर्फ बबिता भोसले (वय 35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आशिष भोसले (वय 32) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी स्वप्नील बाळासाहेब खांदवे (वय ३०) यांनी विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी आशिष भोसले याला अटक केली आहे.

रुपाली आणि आशिष यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लोहगावमधील संतनगरमध्ये ते भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. आशिष हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करतो तर रुपाली धुणे-भांडी करुन घर चालवत होती. त्यांना सात महिन्यांची मुलगी देखील आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आशिष आला होता. त्यातून त्याने अनेक वेळा तिच्याशी भांडणही केले होते. शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडणं करुन रुपालीला शिवीगाळ केली. या दरम्यान आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करुन तिला जखमी केले. या घटनेबाबत समजताच शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. रुपालीला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या रुपाली हिचे उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

परीमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील, आर राजा पोलिस उपआयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, मनिषा पाटील पोलिस निरीक्षक गुन्हे चंदननगर पोलिस स्टेशन, सचिन धामणे सहाय्यक पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन, रविंद्र ढावरे पोलिस उपनिरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन, पुणे शहर, समु चौधरी महीला पोलिस उपनिरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन आदी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पती आशिष भोसलेला अटक करण्यात आली. विमानतळ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय धामणे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…

विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…

पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…

पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!