धक्कादायक! पुण्यातून कमरेला जिलेटिन बांधून सासरवाडीत गेला अन् दाबले स्विच; एका क्षणात…

पुणे : पत्नी अन् मुले घर सोडून माहेरी गेल्याच्या रागातून एकाने सासरी जात स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आणि आत्मघाती स्फोटात आरोपी पतीसह त्याच्या १५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील अलंद तालुक्यातील मटकी तांडा येथे ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील रहिवासी असलेला शिवलाल राठोड (वय ४९) याचा पत्नी सविता हिच्याशी कौटुंबिक वाद सुरू होता. या त्रासाला कंटाळून सविता या मुलगी वीरा (वय १५) आणि मुलगा प्रकाश (वय १९) यांना सोबत घेऊन कर्नाटकातील आपल्या माहेरी निघून गेली होती. या गोष्टीचा राग मनात धरून शिवलाल मंगळवारी सकाळी थेट सासरवाडीत धडकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे येथे दगड खाणीत काम करत असल्याने शिवलाल याला स्फोटकांची पूर्ण माहिती होती. सासरच्या घरात घुसताच त्याने वादावादी सुरू केली. घरातील मंडळींना काही समजण्याच्या आतच त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. त्या वेळी घरात पत्नी, मुलगी, मुलगा आणि काही नातेवाईक उपस्थित होते. शिवलाल याने क्षणाचाही विचार न करता कमरेला बांधलेल्या जिलेटिनच्या स्फोटकाचा ‘स्विच’ दाबला. क्षणार्धात संपूर्ण घर हादरवणारा भीषण स्फोट झाला. या स्फोटात शिवलालच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या, तर शेजारीच बसलेल्या त्याची मुलगी वीरा (वय १५) हिचाही जागीच मृत्यू झाला.

स्फोट एवढा भीषण होता की, संपूर्ण घरासह शेजारच्या काही घरांनाही मोठा तडा गेला आणि परिसरात एकच घबराट पसरली. या घटनेत सविता राठोड (पत्नी), प्रकाश राठोड (वय १९, मुलगा), सुरेखा चव्हाण (वय ३०, नातेवाईक), विवेक चव्हाण (वय १२) आणि नितेश हे सर्वजण गंभीररीत्या भाजले आणि जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात शिवलाल याने हे अतिशय शक्तिशाली जिलेटिनच्या कांड्या पुण्यातील खाणीतूनच चोरून आपल्यासोबत गुलबर्गा येथे आणल्याचा संशय आहे. पुण्यातील खाणीतून एवढी घातक स्फोटक सामग्री बाहेर कशी आली आणि तो कोणत्या मार्गाने कर्नाटकात घेऊन गेला, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

पुणे जिल्ह्यात लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध अन् युवतीचा गूढ मृत्यू…

राजस्थानमधून आरोपीने कुरिअरने मागवल्या तब्बल ४१ तलवारी अन्…

पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…

प्रेमाचा त्रिकोण! पुण्यात प्रियकराची सपासप वार करत निर्घुण हत्या…

हृदयद्रावक! पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!