
पुणे जिल्ह्यात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी टळला मोठा अनर्थ…
सासवड (पुणे): अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहाटे साडेचारच्या सुमारास सासवड परिसरातील दीप पॅकेजिंग या पुष्ट्याचे बॉक्स तयार करणाऱ्या फॅक्टरीला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही फॅक्टरी प्रमोद कोठारी यांची असून, आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
जमीन मालक मोना ढुमे हे अंगारकी चतुर्थी निमित्त पहाटे लवकर उठले होते. फॅक्टरीला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले तसेच मित्रपरिवाराला मदतीसाठी संपर्क केला. त्यांच्या एका हाकेला प्रतिसाद देत संदीप झेंडे, गणेश ढुमे आणि युवराज जाधव हे सर्वजण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वेळेत मदत मिळाल्यामुळे आग पसरली नाही आणि संभाव्य जीवितहानी टळली.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
दरम्यान, सासवड नगरपरिषदेचा अग्निशमन पंप बंद अवस्थेत असल्यामुळे तो वेळेत घटनास्थळी पोहोचू शकला नाही. मात्र जेजुरी येथील अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग पूर्णतः नियंत्रणात आणली. पोलिस प्रशासनानेही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी उपस्थित राहत आवश्यक ती मदत केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांनी दाखवलेले धैर्य, एकजूट आणि माणुसकी सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी घडलेली ही घटना समाजात सकारात्मकतेचे आणि सहकार्याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…
Surprise Video! लेक PSI झाल्यानंतर वर्दीतच घरी परतली; असू अन् हसू…
पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…
पुणे शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी; पाहा रचना…

