पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात भीषण आग…

पुणे: पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात आज (गुरुवार) दुपारी अचानक भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शनिवारवाड्याच्या मुख्य गेटजवळ साठलेला कचरा आणि वाळलेल्या लाकडांनी पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज दुपारी साडे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. गेटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळलेली लाकडं आणि पालापाचोळा साठलेला होता. या कचऱ्याने अचानक पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता ही आग ४० ते ५० मीटर अंतरापर्यंत पसरली, ज्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्याजवळ अशाप्रकारे आग लागल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती, मात्र वेळेत मदत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, सध्या पुण्यात तापमान वाढलेले असून कडाक्याचे ऊन पडत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे वाळलेला कचरा आणि लाकडांनी पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Video: पुणे शहरात आगीचे रौद्र रूप, ६० वाहने जळून खाक…

पुणे! एका १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू…

पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…

पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!