मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

यवतमाळ: घाटंजी येथे गुरू-शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकालाही अटक करण्यात आली आहे.

मुख्याध्यापकाने पीडित मुलीवर चारचाकी वाहनात अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याआधीही शाळेतील डिजिटल खोलीतही अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप या मुख्याध्यापकावर आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली असून पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, या घटनेने शिक्षण क्षेत्रासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार…

मुख्याध्यापक बापाने नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुलीचा घेतला बळी…

मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!