राजस्थानमध्ये एसी स्लीपर बसला आग; 20 जणांचा होरपळून मृत्यू…

जयपूर (राजस्थान) : जैसलमेरमध्ये खासगी आराम बसला लागलेल्या भीषण आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचाही मृत्यू झाला. आगीत पंधरा जण 70 टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. जखमींमध्ये लग्नापूर्वीच्या शूटिंगनंतर जोधपूरला परतणाऱ्या जोडप्याचा समावेश आहे. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता एका एसी स्लीपर बसला आग लागली. या अपघातात 20 […]

अधिक वाचा...

पुणे! एका १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू…

पुणे (संदिप कद्रे): एका १४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पुण्यातील उंड्री येथील जगदंबा भवन रोडवरील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी आग लागली. […]

अधिक वाचा...

Live Video सुरु असतानाच झाडल्या गोळ्या; इन्फ्लूएंसरचा जागीच मृत्यू…

मेक्सिको: ब्यूटी सलूनमधून टिकटॉक लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना गोळ्या झाडण्यात आल्यामुळे इन्फ्लूएंसरचा जागीच मृत्यू झाला आहे. १४ मे २०२५ रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या जलिस्को प्रांतातील झापोपन येथे ही घटना घडली आहे. व्हालेरिया मार्केज (वय २३) सलूनमध्ये टिकटॉकवर लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…

पुणे: पुणे शहराच्या वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पत्र्याच्या बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घडली. वारजे माळवाडी भागातील गोकुळ नगरमध्ये असलेल्या काही पत्र्याच्या घरांना मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. एका घरात सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण […]

अधिक वाचा...

पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात असलेल्या एका चहाच्या दुकानात दूध तापवताना सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत संतोष हेगडे (वय २०) या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. ३०) सायंकाळी चारच्या सुमारास दुकानातील कामगार संतोष चहा बनवत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामुळे ग्राहक आणि अन्य कामगारांनी तातडीने बाहेर धाव […]

अधिक वाचा...

पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट…

पुणे: पुणे शहरातील हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला बुधवारी आग लागल्याची घटना घडली. यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सुरुवातीला शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यानंतर हे जळीतकांड बसचालकानेच घडवून आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी चालक जनार्दन हुंबर्डीकर (वय ५७) […]

अधिक वाचा...

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने घेतले धक्कादायक वळण…

पुणे : हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आले आहे. ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (ता. 20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू…

जळगाव: घरासमोर खेळत असताना शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देवांशू सुनील सोनवणे असे मृत्युमुखी पडलेल्या बाळाचे नाव आहे. त्याच्यावर गेल्या दहा दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरू होते. देवांशूच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नांद्रा खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. देवांशू हा 11 जानेवारी रोजी रात्री घरासमोर पेटवलेल्या शेकोटीजवळ वॉकरमध्ये […]

अधिक वाचा...

रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू…

चेन्नईः तमिळनाडूच्या डिंडीगूल येथील एका खासगी रुग्णालयात लागलेलया भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. रुग्णालयाला आग लागली, तेव्हा रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू होते. आगीच्या घटनेनंतर रुग्णांना तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयाला गुरुवारी (ता. १२) रात्री १० च्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन आणि […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजला शुक्रवारी (ता. १५) रात्री आग लागली. या आगीत एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आग मोठी असल्याने आता मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शॉर्ट सर्किट आणि नंतर एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!