नागपूर! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू…

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत आज (रविवार) सकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला आहे.

कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज झाला. स्फोटात जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटनंतर परिसरात आगही लागली आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशामक विभगाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. कंपनीच्या परिसरात कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी 15 मृत्यू आणि 20 जखमी झाले असल्याचे सांगितले आहे. या ठिकाणी कंपनीकडून सुरक्षितते बद्दल मोठं दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशिक्षणा शिवाय आणि कुठलीही आवश्यक ती काळजी न घेता कामगार वापरले जातात, असा त्यांचा आरोप आहे.

नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून विवाहित शेजाऱ्याने युवतीला संपवलं अन्…

नागपूर! प्रेयसीचा OYO हॉटेलमध्ये गळा चिरून हत्या…

नागपूर! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह…

नागपूर! एकाच कुटुंबातील 5 जणांचे पाण्यात आढळले मृतदेह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!