अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळले Video; सहा अटकेत…

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्यासह आतापर्यंत सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.

संबंधित प्रकरण उघडकीस आल्यापासून पोलिसांनी अनेकांची धरपकड केली आहे. आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. यात मुख्य आरोपी मोहम्मद आयाज मोहम्मद तन्वीर याच्यासह उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान, मोहम्मद साद मोहम्मद सादिक आणि इतर दोन जणांचा समावेश आहे. याशिवाय अन्य चार जणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

या संवेदनशील प्रकरणाचा तपास कोणाच्याही दबावाखाली होऊ नये. तो निष्पक्षपातीपणे व्हावा, यासाठी अमरावती पोलिस अधीक्षकांनी मोठे फेरबदल केले आहेत. तपासावर कोणताही परिणाम होऊ नये, या हेतूने सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आणि ६ पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला जोडले आहे. आतापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून ५ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांना तपासादरम्यान तब्बल १८ अश्लील व्हिडिओ लागले आहेत. याशिवाय ३९ आक्षेपार्ह फोटोही पोलिसांनी जप्त करण्यात केले आहेत. आरोपी आयाज याने एकूण आठ मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. यातील दोन युवतींचे त्याने अश्लील व्हिडीओ काढले होते. तर इतर सहा जणींचे त्याने आक्षेपार्ह फोटो काढले होते. आरोपींनी हे व्हिडिओ केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले की यामागे काही मोठं रॅकेट आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, जप्त केलेले मोबाईल अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले आहेत.

अमरावतीच्या मोहम्मदला अटक, १८० तरुणींचे लैंगिक शोषण अन् ३५० Video…

अमरावतीत तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीवर गुन्हा दाखल…

मुंबईत Live कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस, युवक-युवतीचा मृत्यू…

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!