अमरावती! पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येचे कारण आलं समोर…

अमरावती: अमरावतीमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२८ जून) सायंकाळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!

ASI अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी कशामुळे केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होत नव्हते. आता अखेर पोलिसांनी हत्येच्या कारणाचा उलगडा केला आहे. एका महिलेसोबत पोलिस अधिकाऱ्याच्या भावाचे आर्थिक व्यवहार होते, याच कारणातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. केवळ मध्यस्थी केली, याच कारणातून आरोपींनी भररस्त्यात ASI अब्दुल कलाम यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ASI अब्दुल कलाम यांच्या भावाने एका महिलेकडून ७० हजार रुपये उधार घेतले होते. त्याच रकमेवरून संबंधित महिलेच्या मुलांमध्ये आणि कलाम यांचा भाऊ आणि पुतण्यांमध्ये वाद झाला होता. हा वाद पोलिस ठाण्यातही पोहोचला होता. पण तेव्हा पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यात कलाम यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला होता. हा राग मनात धरून महिलेच्या मुलाने इतर दोन मित्रांच्या मदतीने कलाम यांच्या हत्येचा कट रचला.

ASI कलाम हे शनिवारी दुचाकीने जात होते. याचवेळी पाठीमागून कारमधून आलेल्या तीन जणांनी त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कलाम खाली पडले. यानंतर आरोपींनी चाकूने छातीत वार करून कलाम यांचा जीव घेतला. खुनाचा मुख्य सूत्रधार जियानोद्दीन वल्द एहसानोद्दीन (वय २२, रा. अराफतनगर, अमरावती) हा असून त्याच्यासह आवेज खान अयुब खान (वय २२, रा. दर्यापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याच वेळी फाजील खान साबिर खान (वय २३) हा तिसरा आरोपी पाय फॅक्चर असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल असून, पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.

अमरावतीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची क्रूरपणे हत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या…

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या, पाहा नावे…

Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…

महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या…

पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…

लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!