पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण येथे एकाने आपल्याच चुलतीचा खून करून बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता. तीन महिन्यानंतर त्याचे बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधातून आरोपीनेच चुलतीचा खून केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.

अनिल धावडे आणि सतीलाल वाल्मीक मोरे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. लताबाई बबन धावडे असे हत्या झालेल्या माहिलेचे नाव आहे. ७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी तीनच्या सुमारास वरवंड हद्दीतील दादा दिवेकर यांच्या शेतात लताबाई यांचा मृतदेह आढळून आला होता. छिन्नविछिन्न स्वरुपात हा मृतदेह आढळल्याने त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची शंका उपस्थित करण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात चुलतीचा मृत्यू झाल्याचा बनाव अनिल धावडे आणि त्याच्या शेतात काम करणाऱ्या सतीलाल याने रचला होता.

आरोपींनी वनविभागाकडे नुकसान भरपाईसाठी लाखो रुपयांची मागणी केली होती. मात्र, पोलिस आणि वनविभागाच्या तपासामुळे अखेर या खुनाला वाचा फुटली आहे. त्यामुळे बिबट्या निर्दोष ठरला असून पुतण्याच खुनी निघाला. वन विभाग आणि यवत पोलिसांनी तपास केला. लताबाई धावडे यांचे घेतलेले नमुने नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यातून हा हल्ला वन्य प्राण्याने केला नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांचा खून झाल्याचा अहवाल या प्रयोगशाळेने दिला. तोंड व डोके दगडाने ठेचून हत्या केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी धावडे कुटुंबीयांची कसून चौकशी केली. यानंतर उपसरपंच असलेला पुतण्या अनिल धावडे आणि शेतमजूर सतीलाल मोरे यांनीच अनैतिक संबंधातून लताबाई धावडे यांचा खून केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, लता धावडे या गवत खुरपण्यासाठी शेतात गेल्यानंतर त्यांना सतिलाल याने बाजुला बोलावले. आपल्या पुतण्याच्या घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळे त्या त्याच्यासोबत बांधावर गेल्या. त्यावेळी त्यांचे तोंड दाबून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर मग मुख्य आरोपी त्या ठिकाणी गेला. या दोघांनी मिळून दगडाने मारून खून केला आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत पाटस पोलिस चौकीचे उपनिरीक्षक सलीम शेख यांनी तक्रार दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे हे करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…

पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू…

माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!