हृदयद्रावक! इंद्रायणी अपघातात ‘फादर्स डे’लाच वडील आणि मुलाने गमावला जीव…

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे रविवारी (ता. १५) इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला आहे, या अपघातामध्ये अनेक पर्यटक वाहून गेले आहेत, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर तळेगावमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेल्या 4 जणांमध्ये वडील आणि त्यांच्या 6 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. रोहित माने आणि त्यांचा 6 वर्षांचा मुलगा विहान रोहित माने या दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. फादर्स डे च्या दिवशीच दोघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पावसाळ्यात कुंडमळ्यात पर्यटक नेहमी गर्दी करत असतात. फादर्स डे आणि रविवार असल्यामुळे कुंडमळ्यात मोठी गर्दी झाली होती. दुपारी 3 च्या सुमारास पर्यटक पुलावर उभे होते तेव्हा हा पूल कोसळला आणि काहीजण नदीत पडून वाहून गेले. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. कुंडमळ्यात नेहमी पर्यटक येतात हे माहिती असतानाही त्यांच्या सुरक्षेसाठी इथे कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या? तसंच जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.

इंद्रायणी नदीवरील पूल अपघातातील जखमी आणि मृतांची नावे पाहा…

हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप…

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…

Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!